सुरुवातीच्या व्यवहारात शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ
नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान तेजीचे वातावरण दिसून आले. आजच्या व्यवहाराची सुरुवातही किरकोळ मजबुतीसह झाली. मात्र, बाजार उघडताच विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्दे
Stock Market Early Trade


नवी दिल्ली, 15 मे (हिं.स.)। देशांतर्गत शेअर बाजारात आज सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान तेजीचे वातावरण दिसून आले. आजच्या व्यवहाराची सुरुवातही किरकोळ मजबुतीसह झाली. मात्र, बाजार उघडताच विक्रीचा दबाव निर्माण झाल्याने सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक काही काळासाठी घसरून लाल निशाणात गेले होते. त्यानंतर खरेदीदारांनी जोरदार लिवाली केल्यामुळे या दोन्ही निर्देशांकांनी पुन्हा सावरत हिरव्या निशाणात स्थान मिळवले. सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ०.४६ टक्के आणि निफ्टी ०.५२ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.

आज सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारातील आघाडीच्या शेअर्समध्ये टीएमपीव्ही, इन्फोसिस, टेक महिंद्रा, कोल इंडिया आणि टीसीएस यांच्या शेअर्समध्ये ५.२८ टक्क्यांपासून २.०१ टक्क्यांपर्यंत मजबुती दिसून आली. दुसरीकडे, हिंदाल्को इंडस्ट्रीज, रिलायन्स इंडस्ट्रीज, एटरनल, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि अदानी एंटरप्रायझेस यांच्या शेअर्समध्ये १.८९ टक्क्यांपासून १.०३ टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली.

आतापर्यंतच्या व्यवहारात शेअर बाजारात २,६१८ समभागांमध्ये सक्रिय व्यवहार सुरू होता. यापैकी १,४७९ शेअर्स नफ्यासह हिरव्या निशाणात व्यवहार करत होते, तर १,१३९ शेअर्स तोट्यासह लाल निशाणात व्यवहार करत होते. त्याचप्रमाणे, सेन्सेक्समधील ३० शेअर्सपैकी २१ शेअर्स खरेदीच्या पाठबळामुळे हिरव्या निशाणात होते, तर नऊ शेअर्स विक्रीच्या दबावाखाली लाल निशाणात व्यवहार करत होते. निफ्टीमधील ५० शेअर्सपैकी ३६ शेअर्स हिरव्या निशाणात, तर १४ शेअर्स लाल निशाणात व्यवहार करताना दिसत होते.

बीएसईचा सेन्सेक्स आज ९८.३८ अंकांच्या किरकोळ वाढीसह ७५,४९७.१० अंकांच्या पातळीवर खुला झाला. व्यवहार सुरू होताच विक्रीचा दबाव वाढल्याने हा निर्देशांक घसरून ७५,२५१.१५ अंकांच्या पातळीपर्यंत खाली आला. त्यानंतर लगेचच खरेदीदारांनी लिवाली सुरू केल्याने सेन्सेक्समध्ये पुन्हा तेजी आली. मधूनमधून विक्रीचे किरकोळ झटके बसत असले तरी निर्देशांकाची गती कायम राहिली. सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स ३४५.४५ अंकांच्या वाढीसह ७५,७४४.१७ अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

सेन्सेक्सप्रमाणेच एनएसईच्या निफ्टीनेही आज ४१.८० अंकांच्या वाढीसह २३,७३१.४० अंकांच्या पातळीवर व्यवहाराची सुरुवात केली. बाजार उघडताच विक्रीचा दबाव वाढल्याने हा निर्देशांक घसरून २३,६६३.३५ अंकांच्या पातळीपर्यंत खाली आला. त्यानंतर लगेचच खरेदीदारांनी आघाडी घेत लिवाली सुरू केली.खरेदीच्या जोरावर निफ्टीने अल्पावधीतच सावरत पुन्हा हिरव्या निशाणात प्रवेश केला. मात्र, मधूनमधून नफा वसुलीमुळे विक्रीचे किरकोळ झटकेही बसत होते. तरीदेखील निर्देशांकाची तेजी कायम राहिली. सकाळी १० वाजेपर्यंतच्या व्यवहारानंतर निफ्टी १२३.५० अंकांच्या वाढीसह २३,८१३.१० अंकांच्या पातळीवर व्यवहार करत होता.

याआधीच्या व्यवहार दिवशी गुरुवारी सेन्सेक्स ७८९.७४ अंक म्हणजेच १.०६ टक्क्यांच्या वाढीसह ७५,३९८.७२ अंकांच्या पातळीवर बंद झाला होता. तर निफ्टी २७७ अंक म्हणजेच १.१८ टक्क्यांच्या उसळीने २३,६८९.६० अंकांच्या पातळीवर गुरुवारच्या व्यवहाराचा शेवट झाला होता.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande