मुंबई विमानतळावर 13.29 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; दोघांना अटक
मुंबई, 17 मे (हिं.स.) - अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरुद्ध केलेल्या मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई शाखेने मुंबई विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीचे दोन वेगवेगळे प्रयत्न हाणून पाडले आणि अवैध बाजारात अंदाजे 13.295 क
कोकेन


कोकेन


मुंबई, 17 मे (हिं.स.) -

अमली पदार्थांच्या तस्करीच्या विरुद्ध केलेल्या मोठ्या कारवाईत, महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई शाखेने मुंबई विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीचे दोन वेगवेगळे प्रयत्न हाणून पाडले आणि अवैध बाजारात अंदाजे 13.295 कोटी रुपये किंमत असलेले एकूण 2.659 किलो कोकेन जप्त केले आहे. अमली पदार्थ आणि गुंगी आणणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा, 1985 यातील तरतुदींनुसार या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत, डीआरआय अधिकाऱ्यांनी अदिस अबाबाहून येणाऱ्या एका महिला प्रवाशाला अडवले. तिच्या सामानाची तपासणी केली असता, अधिकाऱ्यांना द्रव स्वरूपातील कोकेन असलेल्या आठ पुड्या सापडल्या. अवैध बाजारात सुमारे 7.875 कोटी रुपये किमत असलेले द्रव स्वरूपातील एकूण 1.575 किलो कोकेन जप्त करण्यात आले.

दुसऱ्या एका कारवाईत, मुंबई विमानतळावर आलेल्या एका आफ्रिकन पुरुष प्रवाशाला डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी अडवले. तपासणीदरम्यान, या प्रवाशाने कोकेन असलेल्या कॅप्सूल्स गिळल्याचे आढळून आले. नंतर त्या प्रवाशाने एकूण 70 कॅप्सूल आपल्या घशातून बाहेर काढल्या. अंदाजे 5.42 कोटी रुपये किंमत असलेले 1.084 किलो कोकेन या कारवाईत जप्त करण्यात आले.

जप्त केलेला प्रतिबंधित माल एनडीपीएस कायदा, 1985 याच्या तरतुदींनुसार जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये गुंतलेल्या व्यापक नेटवर्कचा शोध घेऊन ओळखून उद्ध्वस्त करण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेचे संरक्षण करण्यासाठी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरुद्ध कठोर अंमलबजावणीची कारवाई सुरू ठेवून ‘नशामुक्त भारत’ घडवण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा डीआरआयने पुनरुच्चार केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande