भारताला आध्यात्मिक कवच लाभण्यासाठी मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ संपन्न!
* ''रामराज्या''च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती * भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ! मुंबई, 17 मे (हिं.स.) - सध्याच्या जागतिक अशांततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच
श्री राजमातंगी महायज्ञ पूजन


उपस्थिती


* 'रामराज्या'च्या संकल्पपूर्तीसाठी प्रभादेवी येथे हजारो भाविकांची उपस्थिती

* भारतासह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी घेतला ऑनलाईन लाभ!

मुंबई, 17 मे (हिं.स.) - सध्याच्या जागतिक अशांततेच्या आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, भारताला चारी बाजूंनी अभेद्य आध्यात्मिक संरक्षककवच लाभावे, या मुख्य उद्देशाने मुंबईत ‘श्री राजमातंगी महायज्ञ’ अत्यंत चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला. सनातन संस्थेच्या वतीने प्रभादेवी, मुंबई येथील नर्दुल्ला टँक मैदानात आयोजित या महायज्ञाला ७००० हून अधिक भाविकांनी हजेरी लावली. राष्ट्ररक्षण, देशाची सर्वांगीण प्रगती आणि ‘रामराज्या’ची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणे, हा या आयोजनामागील मुख्य संकल्प होता. या वेळी आमदार श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार डॉ. मनीषा कायंदे, श्री सिद्धिविनायक मंदिराचे कोषाध्यक्ष श्री. आचार्य त्रिपाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर, पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री.रवींद्र प्रभूदेसाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि संत उपस्थित होते. या महायज्ञाचे सनातन संस्थेच्या यूट्यूब वाहिनीवरून थेट प्रसारण विश्वभर करण्यात आले. याचा भारतातील अनेक राज्यांसह अमेरिका, कॅनडा, जपान, जर्मनी, चीन, अर्जेन्टिना, पोलंड, थायलंड, ब्राझिल आदी ४० देशांतील हजारो भाविकांनी यज्ञाचा लाभ घेतला.

सनातन संस्थेते प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी म्हटले की, आज देश चारी बाजूंनी विविध आव्हानांनी वेढलेला असतांना भारताच्या रक्षणासाठी केवळ भौतिक सामर्थ्य पुरेसे नाही, तर त्याला आध्यात्मिक बळाचीही जोड हवी. आदिशक्तीच्या 'दशमहाविद्यां'मध्ये अत्यंत शक्तिशाली मानल्या गेलेल्या श्री राजमातंगीदेवीचा हा महायज्ञ भारताला एक अभेद्य आध्यात्मिक कवच प्रदान करेल. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ज्या मुंबापुरीत (मुंबईतून) धर्मकार्याचा श्रीगणेशा केला, त्याच भूमीतून राष्ट्रउभारणीचे हे एक ऐतिहासिक पाऊल पडले आहे.

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारीणी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यजमान यांच्यासह शेकडो सहयजमान यांनी हे शक्तिशाली वैदिक अनुष्ठान केले. शंखनाद आणि राष्ट्रकल्याणाच्या महासंकल्पाने यज्ञाचा प्रारंभ झाला. श्रीमहालक्ष्मी अष्टोत्तर नामावलीच्या उच्चारात कुंकूमार्चन आणि श्री राजमातंगी देवीच्या मूलमंत्रांनी यज्ञकुंडात आहुती समर्पित करण्यात आल्या. 'महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या' सामूहिक पाठाने विधीची सांगता झाली.या यज्ञाचे पौरोहित्य इरोड, तामिळनाडू येथील शिवागम विद्यानिधी आगमाचार्य श्री. अरुणकुमार गुरुमूर्ती यांनी केले, तर शिवाचार्य श्री. गुरुमूर्ती हे यज्ञाचे मुख्य आचार्य होते.

सध्या सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिराच्या पुनर्निर्माणाला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ साजरे केले जात आहे. या ऐतिहासिक पर्वाचे औचित्य साधत १ हजार वर्षांपूर्वी परकीय आक्रमक महंमद गझनीने भग्न केलेल्या आणि प्रत्यक्ष भगवान चंद्रदेवांनी स्थापित केलेल्या सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाच्या दिव्य अंशांचे थेट मुंबईत दर्शन घेण्याची एक अभूतपूर्व सुवर्णसंधी या यज्ञस्थळी भाविकांना मिळाली; ज्याचा हजारो भक्तांनी अत्यंत भावपूर्ण रीतीने लाभ घेतला. या अध्यात्मिक सोहळ्यासोबतच यज्ञस्थळी लावण्यात आलेल्या सनातननिर्मित अध्यात्म, राष्ट्ररक्षण, आयुर्वेद आणि धर्मशास्त्र या विषयांवरील अनमोल ग्रंथ अन् फलक प्रदर्शनालाही मुंबईकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या सोहळ्याला विविध क्षेत्रांतील मान्यवर, संत-महंत, हिंदुत्वनिष्ठ आणि मंदिर विश्वस्त यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने भारताचा सर्वांगीण विकास आणि शत्रूंच्या नाशासाठी सामूहिक प्रार्थना केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande