बीडमध्ये नामांकित बँडच्या बनावट कॉस्मेटिक्सची विक्री; तीन दुकानांवर छापे
बीड, 25 मे (हिं.स.)। शहरातील बशीरगंज, धोंडीपुरा आणि डी. पी. रोड परिसरातील तीन मोठ्या दुकानांवर छापा टाकून नामांकित कंपन्यांच्या नावाखाली विकली जाणारी बनावट सौंदर्य प्रसाधने (कॉस्मेटिक्स) जप्त केली आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २२ हजार ५९६ रुपयां
बीडमध्ये नामांकित बँडच्या बनावट कॉस्मेटिक्सची विक्री; तीन दुकानांवर छापे


बीड, 25 मे (हिं.स.)।

शहरातील बशीरगंज, धोंडीपुरा आणि डी. पी. रोड परिसरातील तीन मोठ्या दुकानांवर छापा टाकून नामांकित कंपन्यांच्या नावाखाली विकली जाणारी बनावट सौंदर्य प्रसाधने (कॉस्मेटिक्स) जप्त केली आहेत. या धडक कारवाईत पोलिसांनी २२ हजार ५९६ रुपयांचा बनावट मुद्देमाल हस्तगत केला असून, तीन दुकानदारांविरुद्ध कॉपीराईट आणि ट्रेडमार्क कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईच्या 'एसएमसी टॉयलेट्रीज' कंपनीचे वरिष्ठ तपासणी अधिकारी रईसोद्दीन इनामदार यांनी याप्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यांच्या कंपनीकडे 'गोरी ब्युटी क्रीम' या नामांकित ब्रँडचे कायदेशीर अधिकार आहेत. बीडमधील काही दुकानांमध्ये त्यांच्या ब्रँडचे हुबेहूब दिसणारे बनावट क्रीम व साबण विकले जात असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी ही कारवाई केली. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या या दुकानदारांवर सहायक पोलिस निरीक्षक बाबा राठोड आणि पथकाने ही कारवार्ड केली असून, पोलिस पढील तपास करत आहेत.

झडतीमध्ये गोरी क्रीम, फेस फ्रेश, नूरगोल्ड आणि चांदनी क्रीमचा बनावट साठा आढळला. पोलिसांनी येथून १८,३०१ रुपयांचा माल जप्त करत दुकानदार गुन्हा नोंदवला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande