बीडच्या पिंपळवाडीत वादळी वाऱ्याने झाडाखाली आंब्यांचा सडा
बीड, 25 मे (हिं.स.)। तालुक्यातील पिंपळवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. यात आंब्याचे नुकसान झाले आहे. पिंपळवाडी येथील शेतकरी पंडित तुपे यांनी त्यांच्या शेतात ३५० आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे. यंदा सुरुवातीच्या वातावरणामुळ
बीडच्या पिंपळवाडीत वादळी वाऱ्याने झाडाखाली आंब्यांचा सडा


बीड, 25 मे (हिं.स.)।

तालुक्यातील पिंपळवाडी परिसरात वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस झाला. यात आंब्याचे नुकसान झाले आहे.

पिंपळवाडी येथील शेतकरी पंडित तुपे यांनी त्यांच्या शेतात ३५० आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे. यंदा सुरुवातीच्या वातावरणामुळे आंब्याला फळधारणा झाली. यामुळे यंदा चांगले उत्पादन होईल, असा अंदाज होता. कीटकनाशक आणि खतासाठी मोठा खर्च करून आंब्याची निगराणी केली. परंतु, काही दिवसांनी निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ झाली. फळांनी लगडलेल्या झाडांवर फळे विरळ झाल्याने ढगाळ काळात अनुकूल

वातावरणाचा फटका आंब्याला बसला. त्यानंतर अधूनमधून झालेल्या अवकाळी पावसामुळेही आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे झाडांखाली आंब्यांचा सडा पडला. एकही फळ हाती लागणार नसल्याने शेतकऱ्याला कवडीमोल भावात विकण्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande