
लातूर, 26 मे (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त धुळे येथील हेमंत सूर्यवंशी यांनी धुळे ते बाभळगाव (ता. लातूर) अशी पायी पदयात्रा करून अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.
आज सकाळी विलासबाग येथील स्मृतीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्यांनी बाभळगाव येथील निवासस्थानी आमदार अमित देशमुख यांची भेट घेतली. लोकनेते विलासराव देशमुख यांच्याविषयी असलेल्या त्यांच्या भावना आणि श्रद्धेचा आदर व्यक्त करत त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच त्यांचा यथोचित सन्मान करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.
लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्याबद्दल असलेला जनसामान्यांमधील आदर आणि प्रेम या पदयात्रेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis