मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा लातूर जिल्हा दौरा
लातूर, 05 मे (हिं.स.)। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे बुधवार, ६ मे २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांचे ६ मे रोजी सकाळी ६.३० वाजता लातूर रेल्वे स्ट
संजय राठोड


लातूर, 05 मे (हिं.स.)। राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे बुधवार, ६ मे २०२६ रोजी लातूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांचे ६ मे रोजी सकाळी ६.३० वाजता लातूर रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल व लातूर शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण करतील. सकाळी ६.५० वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व राखीव. सकाळी ९ वाजता लातूर येथून औसाकडे प्रयाण करतील. सकाळी ९.३० वाजता औसा येथे आमदार अभिमन्यू पवार यांच्या निवासस्थानी राखीव. सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वा. दरम्यान औसा तालुक्यातील फतेहपूर, दावतपूर येथील मृद व जलसंधारण विभागाच्या कामांच्या स्थळ पाहणीसाठी राखीव. दुपारी १२.३० वाजता औसा शासकीय विश्रामगृह येथे राखीव. दुपारी १.१५ वाजता औसा येथून लातूरकडे प्रयाण करतील.

मृद व जलसंधारण मंत्री श्री. राठोड यांचे दुपारी १.४५ वाजता लातूर शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल व अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव. दुपारी २.१५ वाजता ते लातूर शासकीय विश्रामगृह येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी ३ वाजता त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात मृद व जलसंधारण विभागाशी संबंधित विविध विषयांच्या अनुषंगाने आढावा बैठक होईल. सायंकाळी ५ वाजता वाडा बँक्वेट हॉल येथे श्री. बळीराम रुपचंद जाधव लिहित ‘गोरमाटी भास्या सब्दकोस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यास ते उपस्थित राहतील. त्यानंतर सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण करतील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande