पुणे - धरणसाखळीत टीएमसी ३२.८७ टक्के पाणीसाठा
पुणे, 06 मे (हिं.स.)। उन्हाळ्याच्या तीव्रतेदरम्यानही खडकवासला धरणसाखळीत यंदा तुलनेने चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणसाखळीत एकूण ९.५८ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ३२.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा २८ टक्के होता. त्य
Dam


पुणे, 06 मे (हिं.स.)। उन्हाळ्याच्या तीव्रतेदरम्यानही खडकवासला धरणसाखळीत यंदा तुलनेने चांगला पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या धरणसाखळीत एकूण ९.५८ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ३२.८७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी हा साठा २८ टक्के होता. त्यामुळे यावर्षीची स्थिती तुलनेने चांगली आहे.

पुणे शहराला प्रत्येक महिन्याला साधारण दीड टीएमसी पाण्याची आवश्यकता असते. त्यानुसार आवश्यक साठा राखून ठेवत खडकवासला धरणातून शेतीसाठी उजव्या कालव्यातून सुमारे दीड हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. गतवर्षी धरणसाखळीत साठा कमी असला, तरी मॉन्सूनचे लवकर आगमन झाल्याने पाणीटंचाई जाणवली नव्हती. त्याचबरोबर चांगल्या पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती, त्याचा फायदा यंदाच्या उन्हाळ्यात होत आहे. मात्र, यंदा पावसाळा लांबल्यास चिंता वाढण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पाऊस कमी पडण्याचा अंदाज व्यक्त केला असून, त्यादृष्टीने शेतकऱ्यांसाठी नियोजन सुरू केले आहे. पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास किंवा आगमन उशिरा झाल्यास धरणसाखळीतील पाणीसाठ्याचे नियोजन जलसंपदा विभागालाही काटेकोरपणे करावे लागणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande