
अमरावती, 07 मे (हिं.स.)।केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या चणा व तूर खरेदी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आल्याने जिल्ह्यातील सुमारे १० हजार शेतकऱयांना मोठा दिलासा मिळाला आहे. चना खरेदीस २९ मेतरतूर खरेदीस ३१ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मध्यंतरी तांत्रिक कारणांमुळे चना खरेदी प्रक्रिया थांबली होती तसेच उद्दिष्टही पूर्ण झाले होते. तूर खरेदीची अंतिम मुदत १ मे तर चना खरेदीची अंतिम मुदत २९ एप्रिल होती. या दरम्यान विदर्भ मार्केटिगफेडरेशनच्या वतीने ११ हजार ३५० शेतकऱ्यांची खरेदीकरिता नोंदणी केली होती. यामध्ये केवळ ६ हजार २४५ शेतकऱ्यांचेच धान्य खरेदी करण्यात आल्याने सुमारे ५ हजार १०५ शेतकरी शिल्लक होते. याशिवाय जिल्हा मार्केटिंगच्या सात केंद्रांमध्ये ८ हजार ३०० शेतकऱ्यांची नोंदणी असताना यामधून ३१८० शेतकऱ्यांकडून चणा आणि तूर खरेदी करण्यात आली. त्यामुळे या केंद्रांवर ५ हजार १२० शेतकरी खरेदीच्या प्रतिक्षेत होते. खरेदी अचानक बंद झाल्याने नोंदणीकृत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर चणा व तूर खरेदी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याकरिता खा.डॉ. अनिल बोंडे व राज्य सहकारी पणन महासंघाचे संचालक नितिन हिवसे यांनी पाठपुरावा केल्याने याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यानिर्णयामुळेजिल्ह्यातील चणाव तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, उर्वरित शेतमाल खरेदीसाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी