राजस्थान : अभिजीत दीपकेवर हल्ला, दोघे ताब्यात
नीट पेपर फुटीविरोधातील आंदोलनादरम्यानची घटना जयपूर, 15 जून (हिं.स.) : राजस्थानच्या जयपूर येथील शहीद स्मारकावर नीट पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजी
अभिजीत दीपकेंना झालेल्या धक्काबुक्कीची क्षणचित्रे


नीट पेपर फुटीविरोधातील आंदोलनादरम्यानची घटना

जयपूर, 15 जून (हिं.स.) : राजस्थानच्या जयपूर येथील शहीद स्मारकावर नीट पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागणीसाठी आयोजित आंदोलनादरम्यान तणाव निर्माण झाला. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना एका अज्ञात व्यक्तीने झापड मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला आणि पोलिसांनी तत्काळ कारवाई करत 2 तरुणांना ताब्यात घेतले.

या घटनेनंतर परिस्थिती काही काळ तणावपूर्ण बनली. पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत आंदोलनकर्त्यांना बाजूला केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या घटनेची चौकशी सुरू असून ताब्यात घेतलेल्या तरुणांची चौकशी केली जात आहे. हे आंदोलन नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांच्या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले होते. आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली. यासंदर्भात कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की विद्यार्थ्यांच्या मागण्या आता केवळ परीक्षा अनियमिततेपुरत्या मर्यादित नसून पारदर्शक आणि जबाबदार शिक्षण व्यवस्थेची गरज आहे. त्यांनी व्यापक शिक्षण सुधारणांची मागणी पुन्हा मांडली.

दीपके यांनी सांगितले की कॉकरोच जनता पार्टीची सुरुवात एका सोशल मीडिया पोस्टमधून झाली होती, जी नंतर राजकीय चळवळीत रूपांतरित झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या विचारांना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला असून पक्षाने देशातील अनेक शहरांमध्ये शिक्षण सुधारणा विषयक आंदोलन केले आहे, ज्यात दिल्ली, लखनौ, पुणे, अमृतसर, बंगळुरू आणि हैदराबाद यांचा समावेश आहे.--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande