स्पेनमधील जंगलात भीषण आग; ११ जणांचा मृत्यू, सहा जखमी
मैड्रिड, 10 जुलै (हिं.स.)।स्पेनमध्ये भीषण जंगलातील आगीच्या तडाख्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. देशात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लागलेली ही आग अलीकडील काळातील सर्वात जीवघेण्या आगींपैकी एक मानली जात आहे. वृत्तांनुसार, आ
स्पेनमधील जंगलात भीषण आग; ११ जणांचा मृत्यू, सहा जखमी


मैड्रिड, 10 जुलै (हिं.स.)।स्पेनमध्ये भीषण जंगलातील आगीच्या तडाख्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. देशात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर लागलेली ही आग अलीकडील काळातील सर्वात जीवघेण्या आगींपैकी एक मानली जात आहे.

वृत्तांनुसार, आगीच्या विळख्यात अडकलेल्या अनेकांचा मृतदेह जळालेल्या वाहनांमध्ये आढळून आला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सुमारे १५० अग्निशमन कर्मचारी आणि स्पेनच्या लष्करी आपत्कालीन दलातील २२० जवान शुक्रवारी युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. अधिकाऱ्यांनी सुरुवातीला १२ जणांच्या मृत्यूची माहिती दिली होती. मात्र, शुक्रवारी सकाळी मृतांचा आकडा ११ असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

सिएरा दे लॉस फिलाब्रेस पर्वतरांगांजवळील एका छोट्या गावाजवळ ही आग लागली. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, घटनेची माहिती देणाऱ्या स्थानिकांच्या मते, वीजवाहिनीची तार तुटून खाली पडल्याने ठिणग्या उडाल्या आणि त्यातून आग भडकली. त्यानंतर ही आग वेगाने जवळच्या जंगलात पसरली.

आपत्कालीन सेवा विभागाच्या माहितीनुसार, आगीमुळे अनेक रस्ते बंद करावे लागले असून सुमारे १,००० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.दरम्यान, या दुर्घटनेबद्दल स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी शोक व्यक्त केला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande