व्हेनेझुएलामध्ये आलेल्या दोन भूकंपांमुळे मृतांची संख्या 4 हजारांच्या वर पोहोचली
काराकास, 11 जुलै (हिं.स.)। व्हेनेझुएलामध्ये 24 जून रोजी आलेल्या विनाशकारी 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपांनंतर मृतांची संख्या वाढून 4,118 वर पोहोचली आहे, तर 16,740 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशभरात हजारो लोक बेघर झाले असून मदत आणि बचावकार्य सातत्
Venezuela Earthquake Death Thousands Still Missing


काराकास, 11 जुलै (हिं.स.)। व्हेनेझुएलामध्ये 24 जून रोजी आलेल्या विनाशकारी 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या भूकंपांनंतर मृतांची संख्या वाढून 4,118 वर पोहोचली आहे, तर 16,740 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशभरात हजारो लोक बेघर झाले असून मदत आणि बचावकार्य सातत्याने सुरू आहे.

तुर्कीच्या वृत्तसंस्था अनादोलू आणि इतर माध्यमांच्या अहवालानुसार, नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रोड्रिग्ज यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना सांगितले की, आतापर्यंत 86,794 प्रभावित कुटुंबांना मदत पोहोचवण्यात आली आहे. त्यांनी सांगितले की, बचाव पथकांनी 6,462 लोकांना सुरक्षित बाहेर काढले आहे.

भूकंपामुळे 856 इमारतींचे नुकसान झाले आहे, तर 190 इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. मदतकार्याच्या अंतर्गत अधिकाऱ्यांनी 9,766 मेट्रिक टन अन्नसामग्री आणि 1.39 कोटी लिटरहून अधिक पिण्याचे पाणी वितरित केले आहे. तसेच 29,966 लोकांना वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. सर्वाधिक प्रभावित किनारी भाग असलेल्या ला गुएरा येथे 800 हून अधिक इमारतींचे नुकसान झाले असून, 190 इमारती पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत.

दरम्यान, संयुक्त राष्ट्र व्हेनेझुएलासाठी मदत आणि पुनर्बांधणीसाठी जवळपास 300 दशलक्ष डॉलरचा निधी उभारण्याचे काम करत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)च्या प्रवक्त्या जुली कोझॅक यांनी सांगितले की, दक्षिण अमेरिकेतील हा देश आपली आर्थिक मालमत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी आयएमएफसोबतही चर्चा करत आहे.दुसरीकडे, मदत आणि बचाव अभियानात 30,076 सरकारी कर्मचारी, 29,843 स्वयंसेवक आणि 3,454 आंतरराष्ट्रीय बचाव कर्मचारी सहभागी झाले आहेत. बेघर झालेल्या लोकांसाठी 89 तात्पुरती मदत छावणी उभारण्यात आली आहेत.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या भूकंपांनंतर आतापर्यंत 1,171 आफ्टरशॉक (भूकंपानंतरचे धक्के) नोंदवले गेले आहेत. 24 जून रोजी आलेल्या 7.2 आणि 7.5 तीव्रतेच्या दोन भूकंपांमध्ये केवळ 39 सेकंदांचे अंतर होते, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. यानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मानवतावादी मदत अभियान सुरू करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande