
नांदेड, 14 जुलै, (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्तीचे अर्ज मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील पात्र विद्यार्थ्यांनी शुक्रवार 24 जुलै 2026 पर्यंत कार्यालयीन वेळेत आवश्यक कागदपत्रांसह सादर करावेत. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी जिल्हा कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी केले आहे.
सन 2026 या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैदकीय व अभियांत्रिकी इत्यादी अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांना सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त टक्केवारी गुण प्राप्त झाले असतील अशा उत्तीर्ण झालेल्या मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यास, विद्यार्थींनींना महामंडळाकडून ज्येष्ठता व जास्त गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यास उपलब्ध निधीच्या अधीन राहून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यामुळे
पुढीलप्रमाणे आवश्यक ती मुळ कागदपत्रे दोन प्रतीसहित आणावीत. मार्कशिट, शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्ड, जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, आधारकार्ड, दोन छायाचित्र, पुढच्या वर्गात प्रवेश घेतल्याची पावती किंवा बोनाफाईड सर्टिफिकिटसह व जिल्हा व्यवस्थाकांच्या नावे शिष्यवृत्ती मागणीचा अर्ज इत्यादी कागदपत्रासह संपर्क साधावा. मुदतीनंतर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आर. एन. पवार यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis