
नांदेड, 14 जुलै (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त नांदेड येथील विभागीय कार्यालयात वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. खासदार रवींद्र चव्हाण यांची यावेळी उपस्थिती होती.
'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य जपत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अविरत धावणारी आपली लाडकी 'लालपरी' आज ७८ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या ऐतिहासिक आणि सुवर्ण क्षणाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी विभागीय कार्यालयाच्या प्रांगणात विविध प्रकारच्या सावली देणाऱ्या रोपांची लागवड करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी महामंडळाला आणि अहोरात्र सेवा देणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis