लातूर - स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश
लातूर, 21 जुलै, (हिं.स.) - लातूर जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक शअमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHT
लातूर - स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या देहव्यापार रॅकेटचा पर्दाफाश


लातूर, 21 जुलै, (हिं.स.) - लातूर जिल्ह्यात अनैतिक मानवी वाहतूक व देहव्यापारासारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक शअमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) ने केलेल्या धडक कारवाईत स्पा सेंटरच्या आड सुरू असलेले देहव्यापाराचे रॅकेट उघडकीस आले आहे. या कारवाईत स्पा सेंटरचा व्यवस्थापक ताब्यात घेण्यात आला असून मालकासह दोघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील महिला पोलीस अमलदार लता गिरी यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मंत्री प्लाझा कॉम्प्लेक्स, औसा रिंग रोड, लातूर येथील नाईस स्पा या स्पा सेंटरमध्ये मसाजच्या नावाखाली बाहेरील जिल्हा व राज्यातून महिलांना बोलावून त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतला जात आहे.

ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आल्यानंतर पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांच्या आदेशानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे यांच्या नेतृत्वाखाली छापा पथक तयार करून बनावट ग्राहकाकडून व्यवहार पूर्ण झाल्यानंतर ठरलेल्या संकेताप्रमाणे छापा टाकण्यात आला. स्पा सेंटरमधील रूम क्रमांक १ मध्ये एक महिला आढळून आली.

यावेळी स्पा सेंटरमध्ये उपस्थित असलेल्या आदित्य जगन रसाळ (वय २४ वर्षे, रा. निवळी, ता. जि. लातूर) याने स्वतः स्पाचा व्यवस्थापक असल्याचे सांगितले. चौकशीदरम्यान सदर स्पा नितीन रावसाहेब काळुंके (रा. नांदगाव, ता. जि. लातूर) यांच्या मालकीचा असल्याची माहिती मिळाली. छाप्यादरम्यान व्यवस्थापकाच्या ताब्यातून मोबाईल फोन, तर काउंटरमधून स्पा महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. तपासामध्ये स्पा सेंटरच्या माध्यमातून बाहेरगावाहून महिलांना बोलावून त्यांची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करून पैशांचे आमिष दाखवत पुरुष ग्राहकांकडून देहव्यापार करून घेत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन, लातूर येथे गुन्हा क्रमांक ४८६/२०२६ अन्वये कलम १४३(३)(५) भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक व्यवसाय (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ चे कलम ३, ४ व ५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी आदित्य जगन रसाळ यास अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी नितीन रावसाहेब काळुंके याचा शोध सुरू आहे. सुटका करण्यात आलेल्या पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून तिला शासकीय महिला निवारा ग्रह लातूर येथे सुरक्षित ठेवण्यात आले असून पुढील आदेशासाठी न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande