जळगाव - १२ लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त
जळगाव, 21 जुलै, (हिं.स.) जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा, एक मारुती सुझुकी अर्ट
जळगाव - १२ लाखांच्या मुद्देमालासह प्रतिबंधित गुटखा जप्त


जळगाव, 21 जुलै, (हिं.स.) जिल्ह्यात अवैध गुटखा वाहतुकीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत १२ लाख ६ हजार ९०८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत महाराष्ट्रात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधित असलेला गुटखा, एक मारुती सुझुकी अर्टिगा कार आणि दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या प्रकरणी बुलढाणा जिल्ह्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याविरुद्ध मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्ह्यात अवैध धंद्यांवर प्रभावी आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सर्व पोलीस ठाणे व विशेष पथकांना कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अवैध गुटखा, मादक पदार्थ आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधात विशेष मोहीम सुरू आहे.

दरम्यान, गोपनीय माहितीदारामार्फत मारुती सुझुकी अर्टिगा (एमएच-३० एझेड-४६६४) या वाहनातून मुक्ताईनगरच्या दिशेने मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची पडताळणी केल्यानंतर एलसीबीच्या पथकाने मुक्ताईनगरकडे जाणाऱ्या मार्गावर सापळा रचला. काही वेळातच संशयित वाहन तेथे येताच पोलिसांनी ते अडवून झडती घेतली.झडतीदरम्यान वाहनात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीत पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande