
धुळे, 21 जुलै (हिं.स.) | धुळे शहरातील देवपूर परिसरात एका लॉजवर पोलिसांनी अचानक छापा टाकत तपासणी केली. या कारवाई दरम्यान लॉजमध्ये अनेक तरुण- तरुणी आढळून आल्यास परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी संबंधितांची ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी करून काही जणांची चौंकशी केली.
प्राथमिक माहितीनुसार ,स्थानिक नागरिकांकडून आणि लोकप्रतिनीधींकडून तक्रार करण्यात आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. संबंधित लॉजमध्ये नियमांचे उल्लंघन होता असल्याची माहिती पॊलिसांनी दिली.पोलिसांनी सांगितले कि, चौकशी साठी ताब्यात घेतलेल्या सर्व व्यक्ती प्रौढ असून त्यांच्या पालकांना बोलावून समुपदेश करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात अश्या या प्रकारच्या घटना टाळण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात येणार आहे.
दरम्यान, परिसरात विनापरवाना किंवा नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या लॉजिंग व्यवसाय आणि इतर व्यावसायिक आस्थापनांचीही तपासणी केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईनंतर परिसरातील नागरिकांनी अशा ठिकाणांवर नियमित कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, तपासाअंती आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर