बीडच्या विकासाला नवी गती! ६२३ कोटींच्या जिल्हा नियोजन आराखड्यास मंजुरी!
बीड, 31 जुलै (हिं.स.)। आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ₹६२३ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली. बैठकीत स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी निधी, नियोजन आणि प
जिल्हा नियोजन समिती


बीड, 31 जुलै (हिं.स.)।

आज पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०२६-२७ या वर्षासाठी ₹६२३ कोटींच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली.

बैठकीत स्व. अजितदादांनी पाहिलेल्या विकसित बीडच्या स्वप्नपूर्तीसाठी निधी, नियोजन आणि प्रशासनाच्या पातळीवर कोणतीही कमतरता राहू दिली जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच विकासाच्या या प्रवासात सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि दर्जेदार नियोजनावर भर देत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोणतेही काम ₹१५ लाखांपेक्षा कमी नसावे, तसेच कामांचे तुकडे करून स्वतंत्र प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले.

जिल्हा नियोजनांतर्गत जिल्हा परिषद व इतर यंत्रणांना उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य विनियोग करून लोकांच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असेही निर्देश देण्यात आले. विकासकामांमध्ये पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्या आणि प्रशासनाच्या गरजांचा समन्वय साधत विकासकामांना प्राधान्य देण्यावरही भर देण्यात आला.

बैठकीतील प्रमुख निर्णय :

▪️ पशुसंवर्धन अंतर्गत कृत्रिम रेतन केंद्र इमारत बांधकामासाठी ₹५.२७ कोटी मंजूर.

▪️ साकूड येथील पशुपैदास प्रक्षेत्र पाणीपुरवठा योजनेसाठी ₹२.९९ कोटी मंजूर.

▪️ १८ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या बांधकाम व दुरुस्तीसाठी ₹४.८९ कोटी मंजूर.

▪️ जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा परिषदेस विशेष निधी.

▪️ २०२५-२६ मध्ये वन विभागामार्फत ४७५.४ हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवड पूर्ण; येत्या काळात आणखी २६३.३० हेक्टर क्षेत्रावर वृक्षलागवडीचे उद्दिष्ट.

▪️ हरित बीड वृक्षलागवड अभियानांतर्गत यंदा ६५ लाख ४९ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट.

▪️ ग्रामपंचायत जनसुविधांसाठी ₹३७.५३ कोटी विशेष अनुदान; ९१ ठिकाणी स्मशानभूमी शेड व ग्रामपंचायत इमारतींची कामे.▪️ ऊर्जा विकास अंतर्गत ६१ कार्यालयांमध्ये अपारंपरिक ऊर्जा साधन विकासासाठी ₹१२ कोटी मंजूर.

▪️ बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकामासाठी ₹२ कोटी मंजूर; एकूण प्रकल्प खर्च ₹४.९५ कोटी.

▪️ कंकालेश्वर मंदिर विकासासाठी ₹११.२१ कोटींची तरतूद.

यावेळी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचा लोगो व शुभंकराचे अनावरण करण्यात आले. तसेच स्पर्धेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. बैठकीत ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांसह विविध विकासविषयक मुद्द्यांवर लोकप्रतिनिधींनी सूचना व मागण्या मांडल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande