अकोला - अनुपस्थित, स्थलांतरीत, मयत, दुबार व इतर याद्या संदर्भात ‘बीएलओं’शी संपर्क साधण्याचे आवाहन
अकोला, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। विशेष सखोल पुनरीक्षणात अपुर्ण पत्त्यांमुळे मतदारांचा शोध घेण्यात मतदार केंद्रस्तरीय अधिका-यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनुपस्थित, स्थलांतरित व इतर अशा मतदारांच्या याद्या मतदान केंद्रांच्या सूचनाफलकांवर लावण्यात आल्या आह
अकोला - अनुपस्थित, स्थलांतरीत, मयत, दुबार व इतर याद्या संदर्भात ‘बीएलओं’शी संपर्क साधण्याचे आवाहन


अकोला, 12 ऑगस्ट, (हिं.स.)। विशेष सखोल पुनरीक्षणात अपुर्ण पत्त्यांमुळे मतदारांचा शोध घेण्यात मतदार केंद्रस्तरीय अधिका-यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनुपस्थित, स्थलांतरित व इतर अशा मतदारांच्या याद्या मतदान केंद्रांच्या सूचनाफलकांवर लावण्यात आल्या आहेत. तरी अद्यापही ईएफ फॉर्म जमा न केलेल्या मतदारांनी तत्काळ ‘बीएलओं’शी संपर्क साधून जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणताही मतदार प्रारुप मतदारयादीमध्ये समाविष्ट होण्यापासून वंचित राहू नये यासाठी मतदान केंद्रावरील नोटीस बोर्डावर अनुपस्थित, स्थलांतरीत, मयत, दुबार व इतर यांच्या याद्या प्रसिध्द करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी निखिल खेमनार यांनी दिली.

अद्यापही आपला ईएफ फार्म जमा न केलेल्या मतदारांनी तात्काळ आपल्या मतदान केंद्राच्या मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधून ईएफ फार्म जमा करावा. सर्व बीएलओ यांना मतदान केंद्रावर निश्चित वेळेत उपस्थित राहण्याच्या व 14 व 16 ला मतदान केंद्रावर विशेष शिबीर आयोजित करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

प्रारुप मतदार यादी ही दि. 24 ऑगस्ट रोजी मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात येणार आहे. ती तपासून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी. आपले नाव मतदार यादीत समाविष्ट नसल्यास 30- अकोला (पश्चिम) विधानसभा मतदार संघाचे पात्र मतदार असल्यास भारत निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार विहीत कागदपत्रासह फॉर्म नं. 6 भरुन आपली नव्याने मतदार नोंदणी करता येईल. कागदपत्रे तपासून नाव अंतिम मतदान यादीमध्ये समाविष्ट करण्याची कार्यवाही करण्यात येईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande