
बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)।
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज बीड शहरातून काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाजपा युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर आणि डॉ.सारिका क्षीरसागर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आयोजित या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले.
सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स येथून सकाळी रॅलीला सुरुवात झाली. हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी भारत माता की जय, वंदे मातरम् यासह देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून सोडला. तिरंग्याच्या रंगांनी सजलेल्या रॅलीमुळे शहरात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis