जलसंपदा मंत्र्यांना आ. प्रकाश शेळके यांचे मतदार संघातील विकास कामांबाबत निवेदन
बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)। माजलगाव मतदारसंघातील सिंचन सुविधा अधिक सक्षम व व्यापक करण्याच्या दृष्टीने आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये प्रामुख्याने, १) मोहरखेड, रेपेवाडी, स
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


बीड, 12 ऑगस्ट (हिं.स.)।

माजलगाव मतदारसंघातील सिंचन सुविधा अधिक सक्षम व व्यापक करण्याच्या दृष्टीने आज जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन विविध महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन सादर केले.

यामध्ये प्रामुख्याने,

१) मोहरखेड, रेपेवाडी, सिंगणवाडी, कासारी, अंजनडोह, सोनीमोहा, जहागीरमोहा व चौडी, ता. धारूर, जि. बीड येथील साठवण तलावांच्या कामांसाठी पाणी उपलब्धतेचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. या प्रस्तावांना पाणी उपलब्धता देण्याबाबत संबंधित विभागास आवश्यक निर्देश देण्याची मागणी केली.

२) सिंदफणा नदीवरील देपेगाव-सांडस चिंचोली, ता. माजलगाव येथील सुमारे १५ ते २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याचे उच्च पातळी बंधाऱ्यात रूपांतर करण्याची मागणी केली.

३) जायकवाडी प्रकल्प टप्पा-२ च्या पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्याबाबत विनंती केली.

४) महाराष्ट्र शासनाने पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातून (कोकण) मराठवाड्यात ६५ टीएमसी अतिरिक्त पाणी वळविण्याच्या योजनेस तत्त्वतः मान्यता दिली असून, सध्या या योजनेचे सर्वेक्षण सुरू आहे. या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी माजलगाव मतदारसंघात नवीन सिंचन प्रकल्प हाती घेण्यासोबतच कार्यान्वित असलेल्या काही प्रकल्पांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली.

माजलगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देत शेतीला शाश्वत पाणीपुरवठा मिळावा, यासाठी या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून तातडीने आवश्यक निर्णय घेण्यात यावेत, अशी विनंती देखील केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande