छ. संभाजीनगर - अपात्रतेची नोटीस बजावलेले २५ पैकी १६ नगरसेवक सुनावणीला गैरहजर
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अपात्रतेची नोटीस बजावलेल्या २५ पैकी १६ नगरसेवक सुनावणीला गैरहजर राहिले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे हे नगरसेवक गैरहजर असल्यामुळे पुढे काय कारवाई होणार याकड
छ. संभाजीनगर - अपात्रतेची नोटीस बजावलेले २५ पैकी १६ नगरसेवक सुनावणीला गैरहजर


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील अपात्रतेची नोटीस बजावलेल्या २५ पैकी १६ नगरसेवक सुनावणीला गैरहजर राहिले असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे हे नगरसेवक गैरहजर असल्यामुळे पुढे काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील ११५ पैकी २५ नगरसेवकांविरोधात तीन अपत्ये, अतिक्रमण आणि अनधिकृत बांधकामांसह विविध कारणांवरून अपात्रतेच्या तक्रारी दाखल आहेत. याप्रकरणी आयुक्त अमोल येडगे यांच्यासमोर सुनावणीला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी ९ नगरसेवकांना बोलावण्यात आले होते. मात्र, यापैकी ८ नगरसेवकांनी आरोपांवर म्हणणे मांडण्यासाठी पुढील तारीख मागितली. आयुक्तांनी त्यांना मुदत दिली. एमआयएमचे नगरसेवक खान अब्दुल मतीन यांनी मात्र आरोप फेटाळले. शहागंज-चमन येथे अतिक्रमण हटाव कारवाईवेळी आपण उपस्थित नव्हतो, तर आपल्या नावाचे दुसरे नगरसेवक तेथे उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला. याची शहानिशा करण्यासाठी आयुक्तांनी कारवाईचा व्हिडिओ तपासण्याचे आदेश दिले. दरम्यान, तक्रारदारांचे पुरावे व कागदपत्रांची तपासणी होणार असून, संबंधित विभागांकडून वस्तुस्थिती अहवालही मागवला जाणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande