नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गत 'कृषी औजारे बँक' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने रावविण्यात येत असलेल्या ''नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावरील शेती कामांच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी ''कृषी औजार
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातर्गत 'कृषी औजारे बँक' योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन


नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने रावविण्यात येत असलेल्या 'नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA) टप्पा-२ अंतर्गत गावस्तरावरील शेती कामांच्या यांत्रिकीकरणाला गती देण्यासाठी 'कृषी औजारे बँक' ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेऊन गावातील महिला बचत गटांनी स्वतःचे उत्पन्न वाढवावे आणि शेतकऱ्यांना माफक दरात सेवा उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.

इच्छुक महिला बचत गटांनी 'FPO-DBT Portal' या वेब प्लॅटफॉर्म किंवा मोबाईल अॅप्लिकेशनवरून ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि बॅक विवरणपत्र जोडणे अनिवार्य आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख सोमवार 31 ऑगस्ट 2026 असून अधिक माहितीसाठी संकेतस्थळ www.ndksp.mahapocra.gov.in ला भेट द्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

योजनेचे मुख्य उद्देश

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना महागडी कृषी यंत्रसामग्री खरेदी करणे शक्य नसते. अशा शेतकऱ्यांना गावस्तरावरच पेरणीपासून काढणीपर्यंतची यंत्रे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देणे, शेतीकामातील महिलांचे कष्ट कमी करणे आणि हवामान वदलाच्या परिस्थितीत शेती अधिक फायदेशीर करणे ही या योजनेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

पात्रता आणि अटी

प्रकल्प गावातील उमेद (MSRLM) किंवा माविम (MAVIM) पुरस्कृत महिला बचत गट आणि गाव संघ या योजनेसाठी पात्र आहेत (एक वर्ष पूर्ण असलेला व एका वर्षाचे सनदी लेखापाल यांचेद्वारे लेखा परीक्षण झालेले असावे ज्यामध्ये प्रकल्प रक्कमेच्या 5 टक्के उलाढाल व 5 टक्के भागभांडवल हवे). बचत गटात वेगवेगळ्या कुटुंबातील किमान 10 सदस्य असणे आवश्यक आहे. एका गावातून एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास ऑनलाईन लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल. ज्या गटांनी यापूर्वी इतर कोणत्याही योजनेतून कृषी औजारे बँकेचा लाभ घेतला आहे. ते या योजनेस पात्र राहणार नाहीत.

अनुदानाचे स्वरूप

या योजनेअंतर्गत कृषी औजारे बँकेसाठी प्रकल्प मूल्याच्या 60 टक्के अनुदान देय आहे ('बैंक एंडेड सबसिडी'). अनुदानाची कमाल गर्यादा 24 लाख रुपये इतकी निश्चित करण्यात आली आहे. 3.20 लाख रुपयांपेक्षा जास्त प्रकल्प मूल्य असल्यास बँक कर्ज घेणे बंधनकारक आहे.

निवडता येणारी यंत्रे

बचतगट त्यांच्या गावातील पीक पद्धतीनुसार ट्रॅक्टर, वीवीएफ (BBF) यंत्र, बेड मेकर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र यांसारखी हवामान अनुकूल तंत्रज्ञानास प्रोत्साहन देणारी औजारे निवडू शकतात. ट्रॅक्टर खरेदी करावयाचा असल्यास त्यासोबत किमान तीन ट्रॅक्टरचलित औजारे खरेदी करणे आवश्यक आहे (टेस्ट रीपोर्ट असणारे), अशी माहिती दत्तकुमार कळसाईत प्रकल्प संचालक आत्मा नांदेड यांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande