चंद्रपूर : नशा सोडा, जीवन घडवा आणि देशाला पुढे न्या - आ. जोरगेवार
चंद्रपूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। तरुण पिढी ही देशाची ऊर्जा आहे, पण ती आज व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यासाठी आपल्याला घरातून आणि शाळेतून, महाविद्यालयातून व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प करावा लागेल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना आ. कि
चंद्रपूर : सरदार पटेल महाविद्यालयात' नशा मुक्त भारत अभियान' .. ' नशा सोडा, जीवन घडवा आणि देशाला पुढे न्या'- आ. किशोर जोरगेवार


चंद्रपूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। तरुण पिढी ही देशाची ऊर्जा आहे, पण ती आज व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यासाठी आपल्याला घरातून आणि शाळेतून, महाविद्यालयातून व्यसनमुक्त समाज निर्मितीचा संकल्प करावा लागेल असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना आ. किशोर जोरगेवार यांनी केले. दरम्यान ' नशा सोडा, जीवन घडवा आणि देशाला पुढे न्या' हा संदेश घराघरांपर्यंत पोहोचवायचा असल्याचे आवाहनही त्यांनी केले.

येथील सरदार पटेल महाविद्यालयांतर्गत कनिष्ठ महाविद्यालयाच्या महिला तक्रार निवारण समिती आणि चंद्रपूर पोलीस दल यांच्या संयुक्त विद्यमाने ' नशा मुक्त भारत अभियान' तसेच महिला व मुलींसाठी स्व- संरक्षण व प्रशिक्षण व सुरक्षा मंत्र प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रज्ञा वाडेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम.काटकर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रमोद कुचनकर, सायबर पोलीस मार्गदर्शक इमरान, बलराम डोडानी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रमोद चौगुले यांनी व्यसनमुक्तीसाठी समाजात जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे, कारण व्यसन केवळ व्यक्तीचेच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचे आणि समाजाचे नुकसान करते असे सांगितले.

यावेळी प्रज्ञा वाडेकर म्हणाल्या की, 'पोस्को' गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये किमान २० वर्षे पर्यंतची शिक्षा होऊ शकते. पोलिसांकडून आणि यंत्रणांकडून तपास अत्यंत संवेदनशीलपणे होणे गरजेचे असते, कारण बालकांच्या मानसिकतेवर याचा मोठा परिणाम होतो असे नमूद करीत विविध उदाहरणांसह त्यांनी या विषयावरील जनजागृती करीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

आजची युवा पिढी ही व्यसनाकडे वळताना जाताना दिसत आहे. व्यसन म्हणजे केवळ ' अल्कोहोलिक' नाही, तर आजच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगातील ''मोबाईल क्रांती ' चा किशोरवयीन विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. तेही व्यसन गंभीर असून त्यावर जनजागृती आवश्यक असल्याचे आपल्या प्रास्ताविकातून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन डॉ. शितल कटकमवार, तर आभार प्रदर्शन प्रा. किशोर भावरकर यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक- शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी डॉ. शेफाली कुमरवार, प्रा. व्हिकी पेटकर, खुष्णुदा शेख, डॉ. दीपाली दांडेकर, अनंता मल्लेलवार यांनी परिश्रम घेतले .

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, शेख रमजान, सुरेश पोटदुखे, जीनेश पटेल यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande