
चंद्रपूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। चंद्रपूर शहरातील रामनगर जलशुद्धीकरण केंद्र (WTP) येथे आवश्यक तांत्रिक काम करण्यात येणार आहे. सदर तांत्रिक कामामुळे रामनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा पुढील ४८ तासांसाठी बंद राहणार आहे अशी माहिती मनपा सूत्रांनी दिली.
या कालावधीत रामनगर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा होणाऱ्या संबंधित भागातील नागरिकांना पाणीपुरवठा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या पिण्याच्या तसेच दैनंदिन वापरासाठी आवश्यक पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा, असे आवाहन चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे.
सदर तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येईल. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात कमी दाबाने किंवा विलंबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करून महानगरपालिकेस सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आलेले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव