जालन्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी खोतकरांनी घेतली शिंदेंची भेट
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : जालना जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासह प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मंगळवारी शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली.
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : जालना जिल्ह्यातील विविध विकासकामांना गती देण्यासह प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी मंगळवारी शिवसेना मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विकासकामे, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा, शहर व ग्रामीण भागातील विकासकामे तसेच मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न आमदार खोतकर यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले. विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासह प्रशासकीय स्तरावर सहकार्य मिळावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

जिल्ह्यातील नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि स्थानिक पातळीवरील प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा खोतकर यांनी व्यक्त केली. जालना जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी राज्य शासनाकडून भरीव सहकार्य मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.या भेटीमुळे जालना जिल्ह्यातील आगामी विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख पंडितदादा भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ. जे. बोराडे, सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande