गणपती पुळे येथील दुर्घटनेतील मयतांच्या वारसांना मदतीचे वाटप
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे येथील दुर्घटनेत बिडकीन ता. पैठण येथील पाच जणांचा मृत्यू झाला होता. या मयतांच्या वारसांचा प्रभारी जिल्हाधिकारी अमोल येडगे व आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात
Q


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। रत्नागिरी जिल्ह्यातील गणपती पुळे येथील दुर्घटनेत बिडकीन ता. पैठण येथील पाच जणांचा मृत्यू झाला होता.

या मयतांच्या वारसांचा प्रभारी जिल्हाधिकारी अमोल येडगे व आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात आले. मुख्यमंत्री सहायता निधीतून या मदतीचे वाटप करण्यात आले.

या दुर्घटनेत आदित्य संतोष राऊत, अनिकेत बंडू हिवराळे, आनंद राजू नरवडे, सोह्म, आदमाने, यश रामेश्वर कांबळे सर्व रा. बिडकीन यांच्या वारसांना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले.प्रत्येकी 5 लाख रुपये मदतीचे सानुग्रह अनुदान मयतांच्या वारसांना यावेळी देण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande