
बीड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र कामगार संघटना बीड जिल्हा सचिव पदी श्री रायचंद कापसे यांची निवड झाली. शिवसंग्राम भवन बीड येथे शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ.ज्योतीताई मेटे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रसंगी उपस्थित शिवसंग्रामचे ज्येष्ठ नेते नारायण दादा काशीद, बीड शहराध्यक्ष सुहास आबा पाटील , शिवसंग्राम तालुकाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पंडितराव माने , प्रसिद्धी प्रमुख मनोज जाधव , शिरूर कासारचे नेते नामदेव धांडे, युवा नेते पिंटू भागडे, गणेश धोंडरे, मिडिया प्रमुख प्रा.पंडित शेंडगे तसेच शिवसंग्रामचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis