मध्य प्रदेशातील भिंडमध्ये पिकअप-डंपरच्या धडकेत 8 मजुरांचा मृत्यू, 23 जखमी
भोपाळ, 18 ऑगस्ट (हिं.स.)। मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग-719 वर गोहद चौराहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छीमका गावाजवळ वेगाने जाणाऱ्या मजुरांनी भरलेल्या पिकअपची समोरून येणाऱ्या डंपरला धडक झाली. चंबळ रेंजचे डीआयजी
MP Bhind 8 laborers killed 32 injured horrifi


MP Bhind 8 laborers killed 32 injured horrifi


भोपाळ, 18 ऑगस्ट (हिं.स.)। मध्य प्रदेशातील भिंड जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग-719 वर गोहद चौराहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छीमका गावाजवळ वेगाने जाणाऱ्या मजुरांनी भरलेल्या पिकअपची समोरून येणाऱ्या डंपरला धडक झाली. चंबळ रेंजचे डीआयजी सुनील कुमार जैन यांनी या अपघातात 8 मजुरांचा मृत्यू आणि 23 मजूर जखमी झाल्याची पुष्टी केली आहे. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर आहे. सर्व जखमींना गोहद आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर ग्वालियरला रेफर करण्यात आले आहे. मृतांची ओळख आणि जखमींची संपूर्ण माहिती गोळा केली जात आहे.

सांगण्यात येते की, हा अपघात सोमवारी रात्री सुमारे 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान झाला. प्राथमिक तपासात महामार्गावर बसलेल्या गायींना वाचवण्याच्या प्रयत्नात पिकअप चालकाने वाहन वळवले. याचवेळी समोरून येणाऱ्या डंपरशी त्याची धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचा पुढील भाग पूर्णपणे क्षतिग्रस्त झाला आणि त्यामध्ये बसलेले अनेक मजूर वाहनात अडकले. अपघाताची माहिती मिळताच गोहद चौराहा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने क्षतिग्रस्त वाहनात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढले. अपघातात पाच मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तीन मजुरांचा रुग्णालयात नेत असताना वाटेत मृत्यू झाला.

अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रदीप पटेल, एसडीओपी महेंद्र गौतम, चौराहा पोलीस ठाण्याचे प्रभारी रामनरेश यादव, गोहद पोलीस ठाण्याचे प्रभारी नरेंद्र सिंह कुशवाह आणि एंडोरी पोलीस ठाण्याचे प्रभारी विवेक प्रभात यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोहोचले. माहिती मिळताच डायल-108 च्या पाच रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. याशिवाय डायल-112 च्या मदतीनेही जखमींना बाहेर काढून गोहद रुग्णालयात नेण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी ग्वालियरला पाठवण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. पाच मृतदेह गोहद येथे, तर तीन मृतदेह ग्वालियर येथे ठेवण्यात आले आहेत. मृत आणि जखमींची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला जात आहे.

अपघातग्रस्त मजूर उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी जिल्ह्यातील पछगवां आणि आसपासच्या गावांतील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ते मध्य प्रदेशातील ग्वालियर जिल्ह्यातील डबरा परिसरातील चिनौर गावात भाताची लागवड करण्यासाठी आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर मजूर पिकअप वाहनाने आपल्या गावाकडे रवाना झाले होते. जखमी नंदलाल पुत्र छेन बिहारी यांनी सांगितले की, पिकअपमध्ये एकूण 29 मजूर बसले होते. सर्वजण वेगवेगळ्या गावांतील होते.

गोहद चौराहा पोलीस ठाण्याचे प्रभारी रामनरेश यादव यांच्या मते, प्राथमिक तपासात पिकअपचा वेग सुमारे 80 ते 90 किलोमीटर प्रतितास असल्याचा अंदाज आहे. याचदरम्यान महामार्गावर बसलेली जनावरे अचानक समोर आल्याने चालकाने त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. वाहन अनियंत्रित होऊन दुसऱ्या दिशेने येणाऱ्या डंपरला जाऊन धडकले. मात्र, पोलिसांनी जनावरांना वाचवण्याचा प्रयत्न हा अपघातामागील प्राथमिक कारण मानले असले तरी दुर्घटनेची वास्तविक परिस्थिती आणि दोन्ही वाहनांचा वेग याची पुष्टी सविस्तर तपासानंतरच होईल.

धडक इतकी भीषण होती की पिकअपचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्रीच्या शांततेत किंकाळ्या ऐकून आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांसोबत मदतकार्यात सहभागी झाले. क्षतिग्रस्त वाहनांमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ प्रभावित झाली होती. त्यानंतर पोलिसांनी वाहने रस्त्यावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande