रत्नागिरी : माय क्लिक फोटोग्राफी स्पर्धेत आराध्य आंबेकर प्रथम
रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘माय क्लिक’ फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत आराध्य अभिषेक आंबेकर याने प्रथम क्रमांक पटका
स्पर्धेतील विजेती छायाचित्रे


रत्नागिरी, 24 ऑगस्ट (हिं.स.) । रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान मंगेश बापूजी तोरगलकर कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त ‘माय क्लिक’ फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेत आराध्य अभिषेक आंबेकर याने प्रथम क्रमांक पटकावला.

महाविद्यालयातील अकरावी-बारावीच्या वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. मोबाइलवर क्लिक केलेले विविध फोटो या स्पर्धेत पाहायला मिळाले. स्पर्धेचे परीक्षण गेल्या आठ वर्षांपासून ‘वाह गोवा’ या प्रसिद्ध हॉटेलसाठी फोटोग्राफी व ब्लॉगिंग करणारे अनुभवी छायाचित्रकार अमेय दत्ते यांनी केले. स्पर्धेत अकरावी वाणिज्यचा आराध्य अभिषेक आंबेकर याने प्रथम क्रमांक पटकावला. बारावी विज्ञानची सुमुखी श्रीराम केळकर हिने द्वितीय, तर अकरावी विज्ञानचा वेदांग विलास नाचणकर याने तृतीय क्रमांक मिळविला. या विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande