


* आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांची संकल्पना
* ‘World Record of Excellence, England’ च्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत देशभक्ती, भारतीय वारसा आणि संस्कृतीचा भव्य रनवे
*वीर जवानांच्या सन्मानार्थ ४ ते ९४ वयोगटातील १०० हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक मानवंदना*
* सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ₹१,००,००१ देणगीची घोषणा
* मनोज सानप यांच्या ‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री प्रयोगाने सभागृह भारावले
ठाणे, 24 ऑगस्ट (हिं.स.) - आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांच्या संकल्पनेतून आणि ASVFI Foundation व Valiant Fame Icon (VFI) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडियन वॉक फॉर नेशन ३.०’ हा World Record of Excellence, England च्या जागतिक विक्रम प्रयत्नांतर्गत आयोजित करण्यात आलेला Heritage, Cultural & Patriotic Runway लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात उत्साहात पार पडला.
कारगिल विजय दिवस आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाने देशभक्ती, भारतीय संस्कृती आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचा प्रेरणादायी संगम घडवून आणला. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या सहकार्याने आयोजित या सोहळ्यात सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी ₹१,००,००१ देणगी जाहीर करण्यात आली.
एकपात्री प्रयोगाने चेतवली राष्ट्रभक्तीची ज्योत
या कार्यक्रमातील सर्वाधिक भावनिक क्षण ठरला तो जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन शिवाजी सानप यांनी सादर केलेला शहीद कॅप्टन विनायक गोरे हा हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोग. शहीद जवानांचे बलिदान, वीरमाता-वीरपित्यांच्या भावना आणि सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे महत्त्व प्रभावीपणे मांडत त्यांनी प्रत्येक नागरिकाने सैनिकांच्या कुटुंबासाठी पुढे येण्याचे भावनिक आवाहन केले. उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या उपक्रमाला भरभरून दाद दिली.
४ ते ९४ वयोगटातील पिढ्यांची राष्ट्रभक्तीपूर्ण वाटचाल
या अनोख्या देशभक्तीपर रनवेमध्ये ४ वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते ९४ वर्षांच्या ज्येष्ठ सहभागींपर्यंत १०० हून अधिक नागरिकांनी भारतीय परंपरा, विविध राज्यांची संस्कृती आणि राष्ट्रप्रेमाचे दर्शन घडवत रॅम्पवर मानवंदना अर्पण केली. हा केवळ फॅशन रनवे नसून भारतीय वारसा, एकात्मता आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची प्रभावी अभिव्यक्ती ठरला. या रनवेमध्ये मेजर प्रांजल जाधव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई-ठाणे), ब्रिगेडियर सुशील भसीन, ब्रिगेडियर उदयकुमार देशमुख (SM, VSM), कर्नल तुषार जोशी (SM), ले. कर्नल नीता चव्हाण, ले. कर्नल नितीशा चौहान, ले. कर्नल मनोज कुमार सिन्हा (SM), ले. कर्नल धरमदत्त गोयल, कॅप्टन प्रदीप पट्टनायक, कमांडर विजय प्रताप सिंग, ले. कमांडर निधी तनेजा, फ्लाईंग ऑफिसर इतिशा, सार्जंट विवेक घोसाळकर तसेच अनेक माजी सैनिक आणि माझगाव डॉकचे चीफ मॅनेजर विज्ञानेश मासावकर यांनी सहभाग नोंदविला.
जागतिक विक्रमाच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल
या भव्य देशभक्तीपर उपक्रमाची दखल घेत World Record of Excellence, England चे उपाध्यक्ष संजय पंजवानी यांच्या हस्ते कार्यक्रमास Provisional World Record Certificate प्रदान करण्यात आले. भारतीय संस्कृती, देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा संगम घडवणाऱ्या या उपक्रमाने जागतिक स्तरावर नोंद होण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले.
आयोजकांचे मनोगत
सैनिकांच्या बलिदानाची परतफेड कधीच होऊ शकत नाही. मात्र त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहणे हे प्रत्येक भारतीयाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. 'इंडियन वॉक फॉर नेशन' हा केवळ एक रनवे नसून राष्ट्राला दिलेली सामूहिक मानवंदना आहे, असे आर्मी ब्रॅट अंजली साखरे यांनी सांगितले.
सहकार्याबद्दल विशेष आभार
या राष्ट्रीय उपक्रमाला Bank of India, IndianOil, LIC, Pitambari, NM तसेच इतर सर्व सहकारी संस्था, प्रायोजक, भागीदार, स्वयंसेवक आणि सहभागी नागरिकांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या योगदानामुळे हा उपक्रम राष्ट्रीय अभिमानाचा प्रेरणादायी सोहळा ठरला.
आयोजक : ASVFI Foundation व Valiant Fame Icon (VFI)
सहकार्य : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, मुंबई • जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे
संचालिका : आर्मी ब्रॅट अंजली साखरे
संपर्क: 9152151296
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी