नांदेड : मुखेड नगरीत भक्तीचा महासागर; कावड यात्रेत आ. तुषार राठोड यांचा उत्स्फूर्त सहभाग
नांदेड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने मुखेड शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. भक्ती, शक्ती आणि उत्साहाने भारलेल्या या यात्रेत शिवभक्तांसह भाजपचे आमदार तुषार राठोड, तरुण सहकारी तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभा
अ


नांदेड, 25 ऑगस्ट (हिं.स.)। पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने मुखेड शहरात भव्य कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले. भक्ती, शक्ती आणि उत्साहाने भारलेल्या या यात्रेत शिवभक्तांसह भाजपचे आमदार तुषार राठोड, तरुण सहकारी तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कावड खांद्यावर घेऊन निघालेल्या या यात्रेत ‘हर हर महादेव’, ‘बम बम भोले’च्या जयघोषाने संपूर्ण मुखेड शहर दुमदुमून गेले. भक्तिमय वातावरणात निघालेल्या या यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कावड यात्रेतील सहभागामुळे श्रद्धा आणि उत्साहाची अनोखी अनुभूती मिळाल्याचे आमदार तुषार राठोड यांनी यावेळी सांगितले. यात्रेनंतर आमदार राठोड यांनी मुखेड येथील पवित्र दशरथेश्वर महादेव मंदिरात जाऊन मनोभावे दर्शन घेतले तसेच भगवान महादेवाला जलाभिषेक केला. यावेळी त्यांनी मुखेड-कंधार मतदारसंघासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. राज्यातील शेतकरी अर्थात बळीराजाला सुखाचे दिवस यावेत, माता-भगिनी सुरक्षित व आनंदी राहाव्यात आणि प्रत्येक नागरिकाचे जीवन सुख, समृद्धी व कल्याणाने भरून जावे, अशी मनोभावे प्रार्थना केल्याचे आमदार राठोड यांनी सांगितले. श्रावणातील या कावड यात्रेमुळे मुखेड शहरात दिवसभर भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. शिवभक्तांचा उत्साह, हरिनामाचा जयघोष आणि महादेवाच्या भक्तीने संपूर्ण शहर भक्तीच्या रंगात न्हाऊन निघाले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande