सिंहस्थ महाकुंभासाठी ‘भक्ती संगम’ची पायाभरणी
देशभरातील भक्तिपरंपरांचा नाशिकमध्ये संगम नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)। सिंहस्थ महाकुंभ मेळा २०२७च्या तयारीला विविध स्तरांवर वेग आला असून, पायाभूत सुविधा आणि भाविकांच्या सोयींसोबतच आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या नियोजनालाही सुरुवात झाली आहे. याच
A  direction for the cultural journey


A  direction for the cultural journey


A  direction for the cultural journey


देशभरातील भक्तिपरंपरांचा नाशिकमध्ये संगम

नाशिक, 31 ऑगस्ट (हिं.स.)। सिंहस्थ महाकुंभ मेळा २०२७च्या तयारीला विविध स्तरांवर वेग आला असून, पायाभूत सुविधा आणि भाविकांच्या सोयींसोबतच आध्यात्मिक व सांस्कृतिक उपक्रमांच्या नियोजनालाही सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ने आगामी सांस्कृतिक उपक्रमांसाठी महत्त्वाची पायाभरणी केली.

या महोत्सवाच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांतील भक्तिपरंपरा नाशिकमध्ये एकत्र आणण्याचा तसेच नागरिकांना विविध सांस्कृतिक परंपरांशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. महाराष्ट्राच्या समृद्ध कीर्तनपरंपरेपासून पंजाबची गुरबाणी, ईशान्य भारतातील नट संकीर्तन आणि अभंग-भजन संगीतापर्यंत विविध कलाप्रकारांचे सादरीकरण या महोत्सवात झाले.

महोत्सवात प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज, ह.भ.प. डॉ. चारुदत्त गोविंदस्वामी आफळे आणि ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनातून महाराष्ट्राच्या भक्तिपरंपरेचा परिचय करून देण्यात आला. श्री. राहुल देशपांडे यांच्या अभंगवारीने अभंगसंगीताचा अनोखा आविष्कार सादर केला, तर कु. मैथिली ठाकूर यांच्या भजनाने नव्या पिढीतील रसिकांनाही भक्तिसंगीताशी जोडले.

महाराष्ट्राबाहेरील भक्तिपरंपरांनाही या महोत्सवात स्थान देण्यात आले. श्री दरबार साहिब, अमृतसर येथील भाई मनिंदर सिंहजी हजुरी रागी यांच्या गुरबाणी शबद कीर्तनातून पंजाबच्या भक्तिपरंपरेचा अनुभव नाशिककरांना मिळाला. तसेच मणिपूरच्या नट संकीर्तन महाजेग्याच्या पारंपरिक सादरीकरणातून ईशान्य भारतातील सांस्कृतिक वैविध्याचा परिचय झाला.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande