नैसर्गिक भाज्या व पारंपरिक आहार संस्कृतीचे संवर्धन ही आरोग्यवर्धक बाब - नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी
बीड, 31 ऑगस्ट (हिं.स.)। परळीत रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन; ‘आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख’ पुस्तकाचे प्रकाशन माती, निसर्ग आणि पारंपरिक आहार संस्कृतीशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची सध्याच्या काळात नितांत गरज निर्माण झाली आहे.पारंपरिक आहारसंस्कृ
रानभाज्या महोत्सव


बीड, 31 ऑगस्ट (हिं.स.)।

परळीत रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन; ‘आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख’ पुस्तकाचे प्रकाशन

माती, निसर्ग आणि पारंपरिक आहार संस्कृतीशी असलेले नाते अधिक दृढ करण्याची सध्याच्या काळात नितांत गरज निर्माण झाली आहे.पारंपरिक आहारसंस्कृतीचे संवर्धन ही आरोग्यवर्धक बाब असून याची अधिकाधिक व्याप्ती वाढली पाहिजे असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी केले.परळीत रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले यावेळी त्या बोलत होत्या.

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि तालुका कृषी अधिकारी, परळी वैजनाथ यांच्या वतीने आयोजित रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते झाले. उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर अध्यक्षस्थानी होते.महोत्सवाच्या निमित्ताने परळीच्या तालुका कृषी अधिकारी अर्चनाताई नागरगोजे यांच्या ‘आरोग्यदायी रानभाज्यांची ओळख’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकात तब्बल ७३ रानभाज्यांची माहिती देण्यात आली आहे. रानभाज्यांचे महत्त्व, त्यांची ओळख आणि त्यामागील पारंपरिक ज्ञान याची सखोल माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे.

यावेळी पुढे बोलताना नगराध्यक्षा सौ. पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितले की,पावसाळ्यात परिसरात नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्या या पूर्वीच्या पिढ्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग होत्या. या भाज्यांची ओळख, ऋतुमान, उपयोग तसेच पारंपरिक पद्धतीने त्यांची तयारी करण्याचे ज्ञान आजच्या बदलत्या जीवनशैलीत हळूहळू लोप पावत आहे. त्यामुळे अशा महोत्सवांच्या माध्यमातून हे पारंपरिक ज्ञान पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

स्थानिक संपत्तीला बाजारपेठेची जोड आवश्यक

रानभाज्यांकडे केवळ पारंपरिक अन्न म्हणून न पाहता त्यातील आर्थिक क्षमता ओळखण्याची गरज आहे. शास्त्रीय पद्धतीने संकलन व संवर्धन, लागवडीसाठी योग्य प्रजातींचा अभ्यास, मूल्यवर्धन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि बाजारपेठेशी जोडणी झाल्यास शेतकरी, महिला बचतगट तसेच ग्रामीण युवकांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग उपलब्ध होऊ शकतात. स्थानिक पातळीवर उपलब्ध नैसर्गिक संपत्तीचे ब्रँडिंग आणि प्रक्रिया उद्योग उभारल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.

अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप हवे

आधुनिक विज्ञानाची जोड देत स्थानिक जैवविविधता आणि पारंपरिक आहारसंस्कृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे. रानभाजी महोत्सवासारख्या उपक्रमांमधून ग्रामीण संस्कृती, आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्था या सर्वच क्षेत्रांना चालना मिळू शकते. त्यामुळे ‘परंपरेपासून रोजगाराकडे आणि स्थानिक ज्ञानापासून शाश्वत विकासाकडे’ वाटचाल करण्यासाठी अशा उपक्रमांना व्यापक स्वरूप देण्याची अपेक्षा या महोत्सवातून व्यक्त करण्यात आली

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande