पंतप्रधान मोदींकडून भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर साध्य केल्याबद्दल कौतुक
नवी दिल्ली, 31 ऑगस्ट (हिं.स.)2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य केला आहे. ही वाढ म्हणजे असाध्य ते साध्य करण्यासारखे (herculean feat) असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 31 ऑगस्ट (हिं.स.)2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य केला आहे. ही वाढ म्हणजे असाध्य ते साध्य करण्यासारखे (herculean feat) असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. या यशातून इंधनाच्या दरातील वाढीचे झटके, पुरवठा साखळीतील अडथळे तसेच जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या परिस्थितीतही देशाच्या जनतेची सामूहिक ताकद आणि लवचिकतेची प्रचिती येते असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

या संदर्भात पंतप्रधानांनी एक्स या समाजमाध्यमावर म्हटले की, 2026-27 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारताने 7.8% इतका सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर (GDP) साध्य केला आहे. ही वाढ म्हणजे असाध्य ते साध्य करण्यासारखे (herculean feat) आहे. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेमुळे इंधनाच्या दरातील वाढीचे झटके बसत असताना तसेच पुरवठा साखळीत अडथळे निर्माण झालेले असतानाही, देशाच्या जनतेने दाखवलेल्या सामुहिक ताकदीच्या बळावरच, भारताने ही उल्लेखनीय प्रगती साध्य करून दाखवली आहे. निराशावाद्यांचे भाकीत फोल ठरले असून देश पुन्हा मोठी प्रगती करत आहे!

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande