
मुंबई, 07 ऑगस्ट (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक ०९.०८.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या मेन लाईनवर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यानच्या हार्बर लाईनवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
यामुळे प्रभावित होणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे असतील:-
मेन लाईन:
ब्लॉकचा कालावधी: माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.१४ ते दुपारी ३.३२ या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन' धीम्या मार्गावरील उपनगरी सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील आणि पुढे मुलुंड स्थानकावर पुन्हा 'डाऊन' धीम्या मार्गावर वळवल्या जातील; त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
ठाणे येथून सकाळी ११.०७ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या 'अप' धीम्या मार्गावरील उपनगरी सेवा मुलुंड स्थानकावर 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील. मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान या गाड्या मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकांवर थांबतील आणि पुढे माटुंगा येथे पुन्हा 'अप' धीम्या मार्गावर वळवल्या जातील; त्या आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.०० ते सायंकाळी ५ .०० या वेळेत येणाऱ्या किंवा तेथून सुटणाऱ्या सर्व 'अप' आणि 'डाऊन' लोकल गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिरा गंतव्यस्थानी पोहोचतील.
हार्बर लाईन:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे (डाऊन हार्बर लाईन) दरम्यान सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (अप हार्बर लाईन) दरम्यान सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या आणि
गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पश्चिम रेल्वेद्वारे वांद्रे आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत 'शॅडो ब्लॉक' घेण्यात येईल.
ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील.
हार्बर लाईनवरील प्रवाशांना ब्लॉकच्या कालावधीत सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी