
* नैसर्गिक आपत्तींपासून पिकांना विमा संरक्षण मिळणार
पालघर, 07 ऑगस्ट (हिं.स.) : पालघर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२६ भात नाचणी व उडीद या पिकासाठी १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. यावर्षी इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ही विमा कंपनी पालघर जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेले आहे. याकरिता इच्छुक व पात्र शेतकरी भात पिकासाठी रु. ६५० प्रति हेक्टर, नाचणी पिकासाठी रु. ४०० प्रति हेक्टर, उडीद पिकासाठी रु. ५४० प्रति हेक्टर याप्रमाणे विमा हप्ता भरून सदर योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. विविध नैसर्गिक आपत्ती पासून आपल्या पिकास संरक्षण यामध्ये मिळू शकते. विमा संरक्षण रक्कम रुपये अधिकतम मर्यादा भात पिकासाठी ६५००० रु., नाचणी पिकासाठी ४०००० रू. उडीद पिकासाठी २७००० रु. इतकी निश्चित करण्यात आलेली आहे.
तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकयांनी या योजनेमध्ये समाविष्ट होऊन विविध नैसर्गिक आपत्ती पासून आपल्या पिकास संरक्षित करावे असे आवाहन श्री. विश्वास बर्वे, उपविभागीय कृषी अधिकारी पालघर यांनी केलेले आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयास संपर्क करावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी