
छत्रपती संभाजीनगर, 07 ऑगस्ट (हिं.स.)। आज मुंबई येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे ( रस्ते ) सचिव श्री. शरद ना. राजभोज यांची भेट घेऊन सिल्लोड–कन्नड रस्त्यावरील अपूर्ण कामांबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी रस्त्याची उर्वरित कामे, ड्रेनेज, ॲप्रोच रस्ते, सुशोभीकरण, वृक्षलागवड तसेच इतर प्रलंबित बाबींचा आढावा घेऊन ही सर्व कामे तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक त्या विशेष उपाययोजना करण्याची मागणी केली.
यावर सचिव श्री. शरद ना. राजभोज यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देत कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या. तसेच सिल्लोड–कन्नड रस्त्याची उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील, अशी सकारात्मक ग्वाहीही त्यांनी दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis