आमच्या पक्षात लुडबुड करू नका; नौटंकी बंद करा! - भाजप आ.राजेश वानखडेंचा रवी राणांवर हल्लाबोल
अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.) तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी नाव न घेता माजी खासदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. गुरुवारी आ.रवि राणा यांनी तिवसा मतदार संघातील भावी उमेदवार म्हणून रविराज देशमुख यांचा नावाचा उल
आमच्या पक्षात लुडबुड करू नका; नौटंकी बंद करा! भाजप आमदार राजेश वानखडे यांचा रवी राणांवर घणाघाती हल्लाबोल


अमरावती, 07 ऑगस्ट (हिं.स.)

तिवसा विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी नाव न घेता माजी खासदार रवी राणा यांच्यावर जोरदार टीका करत राजकीय वातावरण तापवले आहे. गुरुवारी आ.रवि राणा यांनी तिवसा मतदार संघातील भावी उमेदवार म्हणून रविराज देशमुख यांचा नावाचा उल्लेख करीत गेल्या निवडणुकीमध्ये मैच रविराज यांची टिकिट कापलि असल्याचे वक्तव्य केले होते तय वक्त्यावर आज भाजप ग्रामीण अध्यक्ष प्रताप दादा अडसड़ ,आ. प्रवीण पोटे पाटील,आ.राजेश वानखड़े व् भाजप पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत आ. राणांचा चांगलाच समाचार घेतला.

विधानसभा निवडणुकीतील विजयाचे श्रेय घेण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न केविलवाणा असल्याचा आरोप करत, संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण आपणच घडवतो, असा गोड गैरसमज करून घेतलेल्या नौटंकीबाज नेत्यांनी भाजपाच्या विजयाचे श्रेय घेऊ नये, असा टोला ही आ.राजेश वानखड़े यांनी लगावला. इतरांच्या मतदारसंघात अनावश्यक हस्तक्षेप करू नये, अन्यथा बडनेरा मतदारसंघातील घडामोडी जनतेसमोर मांडू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

अमरावती आणि दर्यापूर विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप करत, अमरावतीत भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी तो डाव उधळून लावल्याचा दावा त्यांनी केला. भाजपाचे नेतृत्व, कार्यकर्त्यांचे परिश्रम आणि जनतेच्या पाठिंब्यामुळेच मोठे मताधिक्य मिळाल्याचा विसर पडू देऊ नका, असेही त्यांनी म्हटले.

महानगरपालिका निवडणुकीत भाजपासोबत झालेल्या कथित बेईमानीचाही उल्लेख करत, त्याचे परिणाम योग्य वेळी दिसतील, असा इशारा देण्यात आला. तसेच तिवसा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी विविध राजकीय 'गेम' खेळल्याचा आरोप करत, भाजपातील उमेदवारी तुमच्या सांगण्यावरून दिली जाते, अशा थापा मारणे बंद करा, असेही त्यांनी सुनावले.

शेवटी महायुतीचा धर्म निभवा, आमच्या पक्षात लुडबुड करू नका. पक्ष नेतृत्वासमोर लोटांगण आणि कार्यकर्त्यांचे खच्चीकरण ही नौटंकी बंद करा, असा थेट संदेश देत येणारा काळच बदल कुठे आणि कसा होणार याचे उत्तर देईल, असा दावा आमदार राजेश वानखडे यांनी केला.

हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न - आ.पोटे

प्रवीण पोटे यांनी देखील रवी राणा यांच्या वक्तव्यानंतर प्रतिक्रिया दिली.पार्लमेंट बोर्ड तिकीट कोणाला द्यायची कुणाची कापायचे हे ठरवतात बाहेरचा व्यक्ती तिकीटवर बोलणं ही संयुक्तिक नाही बाहेरच्या लोकांनी बोलू नये ,कुणी दावा करत असेल तर तो दावा खोटा आहे हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असं प्रवीण पोटे म्हणाले.आम्ही किंवा आमचा पक्ष कुबड्या घेऊन आलो नाहीत आम्ही सक्षम आहोत.

कोणाची तिकीट मी कापली, कोणाला मी देतो, हा विषय तर होऊ शकत नाही - आ.अडसड

भाजप पक्षामध्ये आजपर्यंत पक्षाच्या तिकिटाच फायनल हे पार्लमेंटरी बोर्डातच होत असते...कोणाची तिकीट मी कापली, कोणाला मी देतो, हा विषय तर होऊ शकत नाही त्यामुळे रवी राणा यांच्या त्या वक्तव्यामध्ये काहीही तथ्य नाही...भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून ही आज ही आम्ही पत्रकार परिषद घेतली असं स्पष्टीकरण आमदार प्रताप अडसड यांनी दिलं, -----------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande