
जळगाव , 01 सप्टेंबर (हिं.स.) जिल्ह्यात आज (1 सप्टेंबर) सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याची नोंद दिल्ली येथील राष्ट्रीय भूकंप नोंद केंद्रावर झाली आहे.जळगाव जिल्ह्यातील रावेर परिसरात हा भूकंपाचा धक्का बसल्याचे स्पष्ट झाले आहे. धक्का अतिशय सौम्य स्वरूपाचा असल्याने जळगाव जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांना त्याची जाणीव झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.दिल्ली येथील केंद्रावर नोंद झाल्याचा दुजोरा जळगाव येथील आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी दिला आहे. भूकंपाची तीव्रता कमी असल्याने सध्या कोणतीही जीवित किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर