
लातूर, 01 सप्टेंबर, (हिं.स.)। पवित्र श्रावण मासाच्या मंगलमय पर्वानिमित्त लातूर शहरातील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवालयात लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्या उपस्थितीत महाआरती संपन्न झाली.
श्रावण मासाच्या निमित्ताने देवालय परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. आयुक्त राहुल कुलकर्णी यांनी देवालयात उपस्थित राहून विधिवत पूजा-अर्चना केली तसेच महाआरतीचा लाभ घेतला.
यावेळी सिद्धेश्वर देवस्थान समितीच्या वतीने प्रशासक सचिन जांबूतकर यांच्या हस्ते आयुक्त राहुल कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.
महाआरतीप्रसंगी महाआरती समिती प्रमुख विशाल झांबरे, पत्रकार संगम कोटलवार, आशिष साठे, सचिन आलमले, तुकाराम जगताप आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis