रत्नागिरी : मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर
रत्नागिरी, 1 सप्टेंबर, (हिं.स.) । महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या कथित अनास्थेविरोधात तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलनाला रत्नागिर
मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलनातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


रत्नागिरी, 1 सप्टेंबर, (हिं.स.) । महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या कथित अनास्थेविरोधात तसेच मराठी चित्रपटसृष्टीच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर पुकारण्यात आलेल्या मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलनाला रत्नागिरीतूनही पाठिंबा देण्यात आला. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील कलाकारांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना १६ विविध मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.

मराठी चित्रपटसृष्टी बचाव आंदोलनाचे अध्यक्ष सी. ए. प्रसाद दत्तात्रय इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.

रत्नागिरीतील स्थानिक कलाकार डॉ. आनंद आंबेकर, शशिकांत गुरव आणि ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह कलाकारांच्या शिष्टमंडळाने प्रशासनाची भेट घेत मराठी चित्रपटसृष्टी, नाट्य क्षेत्र तसेच कलाकार व तंत्रज्ञांच्या विविध प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande