धाराशिव जिल्हा युवा महोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित धाराशिव जिल्हा युवा महोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार बसवराज पाटील यांनी उपस्थित राहून युवा मह
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 सप्टेंबर (हिं.स.)। कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित धाराशिव जिल्हा युवा महोत्सवाची उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार बसवराज पाटील यांनी उपस्थित राहून युवा महोत्सवाचे उद्घाटन केले. जिल्हाभरातून सहभागी झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत त्यांच्या कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि बौद्धिक गुणांना व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमासाठी सर्व सहभागी युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

युवा शक्ती ही समाजाच्या आणि राष्ट्राच्या प्रगतीची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांच्यातील नेतृत्वगुण विकसित करणे, आत्मविश्वास वाढविणे आणि विविध क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून देणे, या दृष्टीने युवा महोत्सवासारखे उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपल्या कौशल्याचे सादरीकरण करण्यासोबतच विविध क्षेत्रातील नव्या संधींची ओळखही होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि येरमाळा येथील ज्ञान प्रसारक मंडळ संचालित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर यांच्या विचारांना आणि कार्याला साजेसे शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक योगदान देण्याचे काम महाविद्यालयाच्या माध्यमातून सुरू आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू श्री. विजयजी फुलारी सर, ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अनिलजी मोहेकर, उपाध्यक्ष श्री. आबासाहेब बारकुल, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य श्री. अंकुशरावजी कदम, कळंब नगराध्यक्षा सौ. सुनंदाताई कापसे, श्री. संजयजी कांबळे, प्राचार्य श्री. हेमंतजी भगवान, डॉ. श्री. कैलासजी अंभुरे, श्री. प्रकाशजी आष्टे, श्री. दिलीपजी भालेराव, श्री. दादासाहेबजी पाटील, डॉ. श्री. संदीपजी देशमुख, प्रा. किशोरजी शिरसाट, प्रा. दिलीपजी महालिंग, यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व सन्माननीय प्राध्यापक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande