छ. संभाजीनगर - आमखास मैदानातून शुक्रवार सकाळपासून शोभायात्रेला होणार सुरुवात
छत्रपती संभाजीनगर, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथे युवक महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने होणार आहे. शोभायात्रेत जिल्हयातील ५८ महाविद्यालयाचे संघ सघभागी होणार आहेत. आमखास मैदानातून शुक्रवारी सकाळी आठ वाजता शोभायात्रा सुरु होऊन वंदे मात
अ


छत्रपती संभाजीनगर, 10 सप्टेंबर, (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर येथे युवक महोत्सवाची सुरुवात शोभायात्रेने होणार आहे. शोभायात्रेत जिल्हयातील ५८ महाविद्यालयाचे संघ सघभागी होणार आहेत. आमखास मैदानातून शुक्रवारी सकाळी आठ वाजता शोभायात्रा सुरु होऊन वंदे मातरम सभागृहात समारोप होईल.

मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय असलेल्या व मराठवाड्याच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात प्रथमच जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सॅन २०२३ मध्ये स्थापन झालेल्या व १०३ वर्षांची समृद्ध शैक्षणिक परंपरा लाभलेल्या या ऐतिहासिक महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हास्तरीय युवा महोत्सव-२०२६ रंगणार आहे.

मराठवाड्यातील पहिले महाविद्यालय म्हणून ओळख असलेल्या या संस्थेने गेल्या शतकभरात ज्ञान, विज्ञान, साहित्य, कला, प्रशासन, उद्योग, सामाजिक क्षेत्र आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत योगदान देणाऱ्या अनेक पिढ्या घडविल्या आहेत. महाविद्यालयाच्या ज्ञानपरंपरेला युवा कलावंतांच्या सर्जनशीलतेची जोड देत जिल्हा युवा महोत्सवाचे आयोजन होत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

ज्ञान-विज्ञानाची परंपरा आणि नव्या पिढीच्या कलाविष्काराचा संगम या महोत्सवाच्या निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे. जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, युवा कलावंत आणि कला रसिकांच्या सहभागामुळे महाविद्यालयाचा ऐतिहासिक परिसर दोन दिवस सांस्कृतिक उत्साहाने भारून जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी या ऐतिहासिक युवा महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून द्यावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वैशाली संतोष देशमुख यांनी केले आहे.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande