शेतकरी समूह बळकटीकरणासाठी केव्हीकेत प्रशिक्षण शेतकरी समूहांचे बळकटीकरण
नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)। शेतकरी समूह बळकटीकरणासाठी केव्हीकेत प्रशिक्षण शेतकरी समूहांचे बळकटीकरण, प्रभावी व्यवस्थापन आणि शासकीय योजनांचा योग्य लाभ घेऊन समूहाची प्रगती साधण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
Q


नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)।

शेतकरी समूह बळकटीकरणासाठी केव्हीकेत प्रशिक्षण

शेतकरी समूहांचे बळकटीकरण, प्रभावी व्यवस्थापन आणि शासकीय योजनांचा योग्य लाभ घेऊन समूहाची प्रगती साधण्यासाठी कृषि विज्ञान केंद्र, सगरोळी येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. समूह व्यवस्थापन, प्रभावी परिचालन, सदस्यांचा सहभाग आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून समूहाची प्रगती कशी साधावी, याबाबत डॉ. प्रविण चव्हाण, शास्त्रज्ञ (कृषी विस्तार) यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची देगलूर उपविभागाचे तंत्रज्ञान समन्वयक श्री. मल्हारी झुरळे यांनी सविस्तर माहिती देत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणात सगरोळीचे शेतकरी सहभागी झाले होते.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande