
छत्रपती संभाजीनगर, 10 सप्टेंबर (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या मासिक बैठकीत उपकर निधीच्या वाटपावरून जोरदार गोंधळ झाला. निधी वाटपात भेदभाव होत असल्याचा आरोप करत शिंदेसेनेचे सदस्य अनुराग शिंदे यांनी सभेच्या विषयपत्रिकेच्या प्रती फाडून हवेत भिरकावल्या. सत्ताधारी सदस्यांच्या गावांना अधिक निधी देऊन विरोधकांच्या गणांकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप होता. योग्य नियोजन न केल्यास न्यायालयात जाऊन संपूर्ण निधी नियोजनाला स्थगिती आणण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, प्रशासकीय खर्च वगळता उपकरातील ८० लाख रुपयांच्या नियोजनाचा ठराव १४ विरुद्ध ६ मतांनी मंजूर झाल्याचे सभापती कल्याणराव गायकवाड यांनी सांगितले. उपकरातून गावांची गरज आणि लोकसंख्येच्या आधारे निधीचे नियोजन केल्याचा दावा त्यांनी केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis