नांदेड - तेलबिया अंतर्गत सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन विषयावरील प्रशिक्षण
नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)। सदर प्रात्यक्षिके नायगाव तालुक्यातील राहेर आणि बिलोली तालुक्यातील बडूर या गावांमध्ये एकूण 75 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे सोयाबी
अ


नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)। सदर प्रात्यक्षिके नायगाव तालुक्यातील राहेर आणि बिलोली तालुक्यातील बडूर या गावांमध्ये एकूण 75 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर राबविण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी येथे सोयाबीन पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. डॉ. कृष्णा अंभुरे, यांनी सद्यस्थितीतील सोयाबीन पिकावरील प्रमुख कीड व रोग तसेच त्यांच्या एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी किडींच्या व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्यांचा, 5 टक्के निंबोळी अर्काचा तसेच शिफारस केलेल्या कीटकनाशके व बुरशीनाशकांचा योग्य वापर याविषयी माहिती दिली. प्रशिक्षण कार्यक्रमानंतर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच प्रात्यक्षिकासाठी सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-II, कामगंध सापळे आणि 5 टक्के निंबोळी अर्क तयार करण्यासाठी निंबोळी पावडरचे वाटप करण्यात आले.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande