नांदेड - स्मार्ट शेतीसाठी स्मार्टफोनचा प्रभावी वापर; ग्रामीण तरुणांना प्रशिक्षण
नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)। ग्रामीण तरुणांना स्मार्टफोन व डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक कृषीविषयक माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, कृषी सल्ला आणि AI आधारित साधनांचा प्रभावी वापर करता यावा, या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, नांदेड 2 सगरो
अ


नांदेड, 10 सप्टेंबर (हिं.स.)। ग्रामीण तरुणांना स्मार्टफोन व डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आधुनिक कृषीविषयक माहिती, हवामान अंदाज, बाजारभाव, कृषी सल्ला आणि AI आधारित साधनांचा प्रभावी वापर करता यावा, या उद्देशाने कृषी विज्ञान केंद्र, नांदेड 2 सगरोळी येथे “स्मार्ट शेतीसाठी स्मार्टफोनचा प्रभावी वापर” या विषयावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.

यावेळी डॉ. प्रविण चव्हाण, शास्त्रज्ञ, कृषि विस्तार यांनी मार्गदर्शन करताना स्मार्टफोनचा केवळ संपर्काचे साधन म्हणून न वापरता शेतीतील निर्णयक्षमता वाढविणारे प्रभावी साधन म्हणून वापर करण्याचे आवाहन केले. डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेती अधिक आधुनिक, कार्यक्षम व नफाक्षम करण्यासाठी ग्रामीण तरुणांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande