
परभणी, ११ सप्टेंबर (हिं.स.) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व शिक्षकेतर संघटनेच्या परभणी जिल्हाध्यक्षपदी सर्वानुमते प्रा. चरण गोंडाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच छत्रपती संभाजीनगर विभागीय उपाध्यक्षपदी प्रा. रविकांत जोजारे, तर जिंतूर तालुकाध्यक्षपदी प्रा. असद खान यांची निवड करण्यात आली. या नियुक्त्या संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. संगपाल सोनोणे यांनी जाहीर केल्या.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संघटनेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. नियुक्तीपत्रे राज्याध्यक्ष प्रा. दीपक कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, विविध मागण्यांसाठी २१ सप्टेंबर २०२६ पासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis