
गेट मीटिंग घेऊन सहाय्यक मंडळ अभियंता यांना निवेदन
मनमाड, 12 सप्टेंबर (हिं.स.)। : सेंट्रल रेल्वे मजदूर संघ (CRMS), कारखाना शाखा, मनमाड यांच्या वतीने केंद्रीय इंजिनिअरिंग वर्कशॉप तसेच रेल्वे कॉलनीतील विविध प्रलंबित समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सहाय्यक मंडळ अभियंता, मनमाड यांच्या कार्यालयावर धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी गेट मीटिंग घेऊन प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.वर्कशॉपमधील शेडचे मोठ्या प्रमाणात होणारे हेवी लिकेज, वर्कशॉपकडे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरवस्था, वर्कशॉप परिसरातील पाण्याचे मोठ्या प्रमाणात होणारे लिकेज, तसेच रेल्वे क्वार्टरमधील स्लॅब लिकेज, नाल्यांची दुरवस्था, ड्रेनेजची समस्या, वाढलेला मच्छरांचा प्रादुर्भाव, परिसरातील स्वच्छतेचा अभाव आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेकडे होत असलेले दुर्लक्ष या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी झालेल्या गेट मीटिंगमध्ये हेडक्वार्टर कमिटी मेंबर नितीन पवार, प्रवीण बागुल, शेखर दखणे, CRMS सचिव गणेश हाडपे आणि चेअरमन महेंद्र चौथमल यांनी कर्मचाऱ्यांना संबोधित केले. संबंधित समस्या तातडीने मार्गी न लावल्यास संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला.याप्रसंगी ओपन लाईनचे चेअरमन दीपक जाधव, प्रीतम मंत्री, मुक्तार शेख, राजेंद्र पांडे, गफार सय्यद, अमोल खाडे, किशोर वाघ, विशाल महाजन, धनंजय सानप, सुभाष दुनबळे, इरशाद शेख, संदीप घोरपडे, सुभाष सिंग, दीपक सूर्यवंशी, पवन सोनवणे, स्वप्निल निकम, सोमनाथ सनस, संतोष संगमलाल, महेश वाबळे, दिनेश प्रजापती, ज्ञानेश्वर जाधव मेजर, संतोष केदारे, मोरे मेजर, हेमंत सांगळे, हेमंत माळी, इच्छाराम माळी, दीपक बोरसे, अरुण कलवर सतीश शर्मा संतोष घुगरे कमलेश पांडे निवास पासवान धणेश्वर कुमार संजीव पासवान राहुल कुमार विजय रजक यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षितता आणि वर्कशॉप व रेल्वे कॉलनीतील प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मोर्चा व गेट मीटिंगनंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI